अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : कैलासवासी हरिभाऊ बकोरे यांच्या स्मरणार्थ ८५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंबीय श्रीमती सुमती बकोरे, मुलं अभिजीत व अशोक बकोरे आणि नातू गंधार यांनी जनजाती कल्याण या संस्थेला रुपये ११ हजारांची देणगी दिली. यावेळी देणगी स्वीकारताना आश्रमाचे श्रीकांत आपटे, डॉ. नीलकंठ ठाकरे, विशारद पेटकर आणि अनंत पुंड उपस्थित होते. जनजाती कल्याण आश्रम ही संस्था वनवासी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या समाजासाठी विविध सेवा कार्य आणि उपक्रम राबवते. या संस्थेचे हजारो सेवा प्रकल्प देशभरामध्ये कार्यरत आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनजाती कल्याण आश्रमाचे डॉ. नीलकंठ ठाकरे यांनी जनजाती कल्याण आश्रमाचे सेवाकार्य, विविध उपक्रम आणि इतर सर्व योजनांबाबतची माहिती सांगितली. जनजाती कल्याण आश्रमामार्फत हजारो वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. सामाजिक जाणीव जपणाऱ्या सर्वांनी या जनजाती कल्याण आश्रमासाठी पैसे, वस्तू व इतर स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देणगी आणि मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला स्टार हेल्थमध्ये विमा प्रतिनिधी / सल्लागार म्हणून काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते.


