पुण्यात ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवउद्योजकांना उद्योगाच्या संधी, मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ

पुणे , रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी ) :  नवउद्योजकांना उद्योगाच्या संधी, मार्गदर्शन, भांडवल उभारणी आणि व्यवसायवृद्धीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उद्योजकता विकास आघाडीच्या वतीने तिसरी ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ कार्यशाळा पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. हॉटेल कलासागर येथे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नवउद्योजक, उद्योजक, मार्गदर्शक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. राष्ट्रीय महासचिव सत्यजित कुलकर्णी यांनी उद्योजकता विकास आघाडीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रसाद गिजरे, पुणे जिल्हाध्यक्ष राजीव देशपांडे आणि आयोजन समितीचे अध्यक्ष किरण प्रभणे यांनी नियोजन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून परशुराम आर्थिक महामंडळाचे चेअरमन कॅप्टन आशिष दामले, एएमआरयुटी महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय जोशी, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, ब्रह्मोद्योग आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रिविक्रम जोशी, युवा आघाडीचे अध्यक्ष प्रशांत त्रिपाठी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी नवउद्योजकांशी संवाद साधला.

उद्योग उभारणीतील आव्हाने, व्यवसायवृद्धी, मार्गदर्शन, नियोजन आणि नव्या संधी याबाबत विविध सत्रांमधून मार्गदर्शन करण्यात आले. आघाडीच्या मेंटर्सनी सहभागी उद्योजकांच्या प्रश्नांवर चर्चा करून व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अविनाश चाबुकस्वार, भालचंद्र पेंडसे, डॉ. रत्नदीप जोशी, विनय मालशे, शशिकांत जोशी, सुशांत राजपाठक, दिपाली चांडक, अतुल कुलकर्णी, दिनेश अदिगा, उदय अत्रे, धनंजय कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे कॉन्क्लेव्हला व्यापक प्रतिसाद मिळाला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…