निवृत्त ज्येष्ठ वीज कर्मचारी-अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  महाराष्ट्र राज्य वीज मंडळात प्रदीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ कर्मचारी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. अहिल्यादेवी नगर येथील हॉटेल यश ग्रँड येथे झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पदाधिकारी रविंद्र डबीर होते.

मेळाव्यात अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आले. यावेळी त्यांनी सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. वीज उद्योगाच्या विकासात कामगार महासंघाच्या निवृत्त सभासदांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा उपयोग सध्याच्या पिढीतील कर्मचारी, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना व्हावा, यासाठी अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलास झोडगेकर यांनी केले. यावेळी निवृत्त सभासदांच्या विविध समस्या, पेन्शन, वैद्यकीय सुविधा, कल्याणकारी योजना तसेच निवृत्तीनंतरचे सामाजिक जीवन याबाबत चर्चा करण्यात आली. दीर्घ काळानंतर सहकाऱ्यांची भेट झाल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मेळाव्यात ज्येष्ठ कर्मचारी व पदाधिकारी रविंद्र डबीर, पद्माकर कुलकर्णी, आसाराम घुले, बद्रीनाथ डागा आणि प्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला. “सेवानिवृत्ती ही सेवेला पूर्णविराम नसून अनुभवातून समाजाला योगदान देण्याची नवी सुरुवात आहे,” असा संदेश महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे वित्त प्रभारी रविंद्र काडके यांनी दिला. कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी तसेच निवृत्त कर्मचारी सुभाष लोंढे, सुधीर दीक्षित, राजेंद्र कुलकर्णी, सुभाष जगदाळे, अनिल चारणे यांच्यासह वीज क्षेत्रातील माजी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत धर्माधिकारी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोन अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, सचिव गणेश कुंभारे, राहुल वरघंटे, अमोल आभाळे तसेच वीज कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…