नांदेड. दिवाळी आणि छठपूजेच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पटना-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या तीन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07609 नांदेड-पटना विशेष रेल्वे नांदेड येथून दर मंगळवारी 10, 17 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.15 वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर या स्थानकांवर थांबे घेत गुरुवारी सकाळी 8.30 वाजता पटना येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक 07610 पटना-नांदेड विशेष रेल्वे पटना येथून दर गुरुवारी 12, 19 आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.15 वाजता सुटणार असून, शुक्रवारी रात्री 8 वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वे गाडीला प्रथम श्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी शयनयान आणि सामान्य श्रेणीचे असे एकूण 24 डबे असणार आहेत.
दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.
दिवाळी-छठपूजेसाठी नांदेड-पटना विशेष रेल्वे
निबंध स्पर्धेत अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांची चमक; अमृत संस्थेतर्फे विजेत्यांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२६ मध्ये ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेत अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश…
मराठवाड़ा की प्यास बुझाएगा 20 हजार करोड़ का वॉटर ग्रिड!
मराठवाड़ा का नाम सामने आते ही सबसे पहले पानी की किल्लत और सूखे की तस्वीर सामने आती है। सालों से यहां के लोग पानी की समस्या से जूझ रहे हैं।…


