नांदेडमध्ये ब्राऊन शुगरची विक्री; ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

भाग्यनगर पोलिसांची कारवाई; दोघांना ताब्यात घेतले

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर परिसरातील विवेकनगर येथे आशिष किराणा दुकानाजवळ सिमेंट रोडवर ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत ६२ ग्रॅम ब्राऊन शुगर, अंदाजे ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची रीतसर परवानगी व आदेश घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर शासकीय पंच, वैधमापन शास्त्र विभागाचे राजपत्रित अधिकारी आणि पोलीस पथकासह दुपारच्या सुमारास विवेकनगर परिसरातील आशिष किराणा दुकानाजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी मिळालेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे दोन संशयित आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी आपली नावे गुरबिरसिंग हरपालसिंग संधु (वय ५० वर्षे, रा. तरण तारण, पंजाब राज्य, ह.मु. श्रीनगर, नांदेड) आणि जनार्दन गोविंदराव सोनटक्के (वय ३० वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, ता. जि. नांदेड) अशी सांगितली. राजपत्रित अधिकारी व शासकीय पंचांच्या उपस्थितीत दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या पॅन्टच्या खिशातून एकूण ६२ ग्रॅम वजनाचा ब्राऊन शुगर (चिटा) हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ३ लाख १० हजार रुपये आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्सच्या सहाय्यक रासायनिक विश्लेषकांकडून सदर पदार्थ ब्राऊन शुगर असल्याची खात्री करून तो जप्त करण्यात आला.

या अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता, संबंधितांनी हा माल निक्का व बंटी (दोघेही रा. पंजाब राज्य) यांच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुरनं. ६०४/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…