नसरापूर हत्याप्रकरणाचा आज निकाल; आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप?

पुणे : नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा अंतिम निकाल आज पुणे सत्र न्यायालयात जाहीर होणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे राज्यभराचे लक्ष लागले असून न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू होणार आहे. निकाल जाहीर करताना न्यायालय आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाते, तसेच त्या शिक्षेमागील कारणमीमांसाही सविस्तर मांडणार आहे.सुनावणीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना न्यायालयात उपस्थित राहण्याची विशेष परवानगी देण्यात आली असून, विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांच्यासह दोन्ही बाजूंचे वकीलही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, न्यायालय परिसरात पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करणारे फलक झळकले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने न्यायालयाबाहेर जमले असून, या प्रकरणाच्या निकालाबाबत सर्वांच्याच नजरा न्यायालयाकडे लागल्या आहेत.१ मे रोजी नसरापूर परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवले होते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक केली होती. आता या बहुचर्चित प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप, याचा निर्णय आज न्यायालयाकडून स्पष्ट होणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…