डीपफेकचा फटका प्रीती झिंटालाही; मुंबई उच्च न्यायालयात धाव, आक्षेपार्ह AI मजकूर हटवण्याचे आदेश

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार करण्यात आलेल्या डीपफेक फोटो, व्हिडिओ आणि मॉर्फ केलेल्या मजकुरामुळे त्रस्त झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रीती झिंटाने दाखल केलेल्या याचिकेत सोशल मीडिया तसेच विविध वेबसाइट्सवर तिच्या नावाने AIच्या मदतीने तयार करण्यात आलेले बनावट फोटो, व्हिडिओ आणि चॅट मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचा दावा केला आहे. अशा बनावट सामग्रीमुळे तिच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे सांगत हा मजकूर त्वरित हटवावा, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.याशिवाय भविष्यात तिची परवानगी न घेता अशा प्रकारचा कोणताही डीपफेक किंवा मॉर्फ केलेला मजकूर प्रसिद्ध अथवा प्रसारित होऊ नये, यासाठी संबंधितांना आवश्यक आदेश देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह सामग्री त्वरित हटवण्याचे निर्देश दिले असून प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.सध्या AIच्या वाढत्या वापरामुळे डीपफेक व्हिडिओ, फोटो आणि बनावट संदेशांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करून खोटी सामग्री तयार केली जात असल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण होत आहे.
यापूर्वीही ऐश्वर्या राय, जॅकी श्रॉफ आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयाची मदत घेतली होती. आता त्याच मालिकेत प्रीती झिंटानेही न्यायालयात धाव घेतली आहे.दरम्यान, प्रीती झिंटा लवकरच अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून ती अभिनेता सनी देओलसोबत ‘बंटवारा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या प्रदेश संयोजकपदी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती

नागपूर, प्रणय डाबरे (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या प्रदेश संयोजकपदी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची…

दीपोत्सवात सरहद पब्लिक स्कूलमध्ये ऐतिहासिक राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे अनावरण!

आशिष औंढेकर, प्रमुख पश्चिम महाराष्ट्र : दीपोत्सवाच्या मंगल पर्वानिमित्त सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथे २९ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सहभागातून हिंदवी स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक…