एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) सारख्या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी (LPG) सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, सरकार आता ‘नो ड्यूएल गॅस कनेक्शन’ (No Dual Gas Connection) धोरणाचा अवलंब करणार आहे. तुमचे एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते काय? काय होणार त्याचा फायदा आणि तोटा? जाणून घ्या. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक मोठ्या शहरात आणि सोसायट्यांमध्ये पाईपमधून नैसर्गिक गॅसचा (PNG) पुरवठा करण्यात येत आहे. पीएनजी हा एलपीजीपेक्षा अधिक सुरक्षित, स्वस्त आणि सुविधाजनक मानल्या जातो. अनेक घरांमध्ये पीएनजी कनेक्शन पोहचलेले आहे. तरीही जुने एलपीजी सिलेंडर अशा ग्राहकांनी जमा केलेले नाही. सरकारच्या नियमानुसार, एकाच पत्त्यावर दोन वेगवेगळी घरगुती गॅस कनेक्शन असणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे कंपन्यांनी अशा ग्राहकांची शोध मोहीम सुरू केली आहे. ज्या ग्राहकांना अद्याप त्यांचे एलपीजी सिलेंडर सरेंडर केलेले नाही. एजन्सीकडे जमा केलेले नाही. त्यांचे एलपीजी कनेक्शन येत्या जून महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. त्यांना एलपीजी गॅस सेवा मिळणार नाही. जर तुमच्या घरात पीएनजी आणि एलपीजी हे दोन्ही गॅस असतील तर मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी अगोदर गॅस एजन्सीकडे धाव घ्या. इंडेन, भारत गॅस अथवा एचपी गॅस एजन्सीकडे जा. तिथे कनेक्शन सरेंडरचा अर्ज मिळेल. तो अर्ज भरून गॅस सिलेंडर कनेक्शन सरेंडर करण्याची विनंती करा. सोबत तुमचे गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागेल. त्यानंतर कंपनी तुम्हाला सिलेंडर टाकी जमा केल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देईल. एलपीजी सिलेंडर खरेदी करते वेळी जी सुरक्षा रक्कम जमा केली होती. ती ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. त्यानंतर ग्राहकांना कोणत्याही अडथळ्या विना पीएनजी सेवेचा वापर करता येईल.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर एलपीजी सिलेंडरचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सरकारकडून अद्याप याविषयीचे कोणतेही संकेत अथवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मार्च 2026 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. अनेक दिवसानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडर एक हजार रुपये किंमतीच्या आता उपलब्ध होत आहे.


