नागपूर, वंदना खेडीकर ( प्रतिनिधी ): श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे मेगा ब्लड चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. लोककल्याण डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. स्नेहल भावे आणि सहसमन्वयक प्राची तिमांडे होत्या. यावेळी क्लबच्या संस्थापिका डॉ. वंदना खेडीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शिबिरात सीबीसी व थॅलेसेमिया तपासणी करण्यात येणार असून, तपासणीच्या निष्कर्षानुसार विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या उपाध्यक्षा निलिमा बावणे, अध्यक्षा कविता दूरगकर आणि सचिव डॉ. रीमा खराबे यांनी प्रयत्न केले. तसेच क्लबच्या सदस्या अस्विनी वाळके, हर्षा दवे, रंजुश्री चक्रवर्ती, रिया मन्सारामाणी, माधुरी वारवतकर, स्वाती करोले, वैशाली खोब्रागडे आणि प्रधण्या काळे यांनी उपस्थित राहून मोलाची मदत केली. क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सकस खाऊचे वाटप करण्यात आले. भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध मार्गदर्शक प्रकल्प आयोजित करण्याचा क्लबचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


