आगीच्या घटनेनंतर ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे हलविले

अमरावती, राज माहोरे  (प्रतिनिधि ) : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे प्रथमदर्शनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहाटे ४ वाजल्यापासून संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले.

या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण ३६ नवजात बालकांना उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. त्यापैकी २९ बालकांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर विनामूल्य उपचार सुरू आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १९, मुरके रुग्णालयात ८ आणि पारिजात रुग्णालयात २ बालकांना दाखल करण्यात आले आहे. तसेच होप रुग्णालयात ८ बालकांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सात नवजात बालके त्यांच्या मातांसोबत जिल्हा स्त्री रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत. स्थलांतरित बालकांच्या उपचाराचा खर्च पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विनामूल्य करण्यात आला आहे.

या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य सचिव यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच आग प्रतिबंधक सराव एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…