अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: कार्तिक महिन्याचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीतमय श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर ते रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बालिकाश्रम रोड येथील ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज चिंतामणी उपासना केंद्रात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड येथील समर्थ भक्त कथाकार अजयबुवा रामदासी यांच्या रसाळ वाणीतून दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत श्रीराम कथेचे निरूपण होणार आहे.
प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील आदर्श, त्याग, कर्तव्यनिष्ठा, भक्ती आणि मर्यादा पुरुषोत्तम या स्वरूपाचे महत्त्व संगीतमय कथेतून उलगडले जाणार आहे. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध पंचमीला कथेचा शुभारंभ होणार असून २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला सांगता होणार आहे. या संगीतमय श्रीराम कथेचा अहिल्यानगर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


