अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ नाव द्या!

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांची मागणी; महापौर व मनपा आयुक्तांना निवेदन

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांना निवेदन दिले आहे.

मातृभूमीवरील असीम प्रेम, राष्ट्राप्रती अढळ निष्ठा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची जाज्वल्य प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशोकनगर परिसरातील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका निखिल लातूरकर यांनी निवेदनातून मांडली आहे.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला!’ या सावरकरांच्या अजरामर काव्यपंक्तींमधून मातृभूमीविषयीची उत्कट ओढ आणि राष्ट्रनिष्ठेची प्रखर भावना आजही प्रत्ययास येते. त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, त्याग, धैर्य आणि देशभक्तीचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांच्या कार्यातून युवा पिढीला केवळ देशावर प्रेम करण्याचीच नव्हे, तर राष्ट्रहितासाठी कृतिशील होण्याची प्रेरणाही मिळते. त्यामुळे त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण करणे ही केवळ नामफलकापुरती मर्यादित बाब नसून, राष्ट्रप्रेरणेचा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे लातूरकर यांनी नमूद केले आहे.

तीन ते चार दशकांपासून समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा

अशोकनगर परिसरात तत्कालीन नगरपालिकेने सावरकर प्रतिष्ठानसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. गेल्या तीन ते चार दशकांपासून या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोकनगर गेट क्रमांक १ समोरील चौकाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नगरसेवकांनी नामकरणाचा ठराव मांडावा

या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रभाग क्रमांक ५ मधील भाजपचे नगरसेवक ॲड. महेश कनकदंडे, साहेबराव गायकवाड, जयश्रीताई पावडे आणि शांभवी साले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नामकरणाचा ठराव मांडून तो मंजूर करून घ्यावा, असे आवाहनही लातूरकर यांनी केले आहे.

राष्ट्रप्रेम व सामाजिक कर्तव्याची भावना दृढ होईल

महाराष्ट्रात सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या मोजक्या प्रतिष्ठानांमध्ये नांदेडमधील सावरकर प्रतिष्ठानचे योगदान महत्त्वाचे आहे. या चौकाचे नामकरण झाल्यास परिसरातील नागरिकांसह युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक कर्तव्याची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास लातूरकर यांनी व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून सावरकरांच्या राष्ट्रकार्याला साजेसे नामकरण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…