अंतःकरणाच्या शुद्धीकरणासाठी सामुदायिक ध्यानाची गरज : अमोल बांबल

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, राज माहोरे (प्रतिनिधि) : सामुदायिक ध्यानाचा मार्ग हा अंतःकरण शुद्धीकरणाचा महामार्ग आहे. ‘जे ज्याचे ध्यान, तेच त्याचे स्थान’ म्हणून चिंता करण्यापेक्षा मानवी स्वभावाला चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन अमोल बांबल यांनी ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवात सामुदायिक ध्यानावरील चिंतनातून केले.

भौतिक जग पाहण्यासाठी ईश्वराने मानवाला दोन डोळे दिले आहेत, तर आंतरिक जग पाहण्यासाठी महापुरुषांनी ज्ञान आणि वैराग्य हे दोन डोळे दिले आहेत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी शांततापूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सामुदायिक ध्यानाचे तिसरे नेत्र दिले आहे. मानवी मन समजून घेण्यासाठी चित्त पवित्र केले पाहिजे. मानवी वर्तनाचे लक्षण आतून आणि बाहेरून एकसारखे असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक असून, चित्त शुद्ध करण्याची सहज साधना सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून मिळाली आहे. मानवाचे शरीर एका चैतन्यशक्तीतून तयार होते, त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मितीही एका चैतन्यशक्तीतून झाली आहे. ‘अखंड शांती अनुभवया यावी जीवाप्रती’ हे मनुष्यजीवनाचे अंतिम ध्येय आहे. सामुदायिक ध्यानातून मिळणाऱ्या दैवी शक्तीच्या ज्ञानाने सर्वांचे कल्याण साधता येईल. ‘सबका भला करो, यही आवाज करेंगे’ हा विचार प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे.

जोपर्यंत विचार बदलत नाहीत, तोपर्यंत सद्विचारांच्या प्रवाहात सहभागी होता येत नाही. सत्यस्वरूपापासून दूर असलेल्या मानवाने अंतःकरणाचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून घडते. अंतःकरण शुद्ध झाल्याने राग आणि द्वेष दूर होऊन समाज निकोप होण्यास मदत होते. ‘प्रथम पाया मानव-वर्तन। यास करावे उत्तम जतन। गाव करावे सर्वांगपूर्ण। आदर्श चित्र विश्वाचे।।’ या विचारातून मानवाचे वर्तन सुधारण्याचे आणि आदर्श समाजनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…