राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष चौक, कापड बाजार रोड, अर्बन बँक रोड, समाचार प्रेस, लक्ष्मी कारंजा या प्रमुख मार्गांवरून संचलन करत पुन्हा वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथे ध्वजावतरण करण्यात आले.

गेली ९० वर्षे अविरतपणे राष्ट्रसेवेचे कार्य करणारी राष्ट्रसेविका समिती ही अखिल भारतीय महिला संघटना आहे. २५ ऑक्टोबर १९३६ हा समितीचा स्थापना दिवस असून, दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विविध ठिकाणी सघोष पथसंचलन आयोजित केले जाते. अहिल्यानगर शहरात यापूर्वी केडगाव, भिंगार, निर्मल नगर आदी भागांत संचलन काढण्यात आले असून, यंदाचे हे १२ वे संचलन होते.ध्वजारोहणानंतर संचलनाला सुरुवात झाली. घोषाच्या तालावर एकसारखी शिस्तबद्ध पावले टाकणाऱ्या ज्येष्ठ महिला, तरुणी आणि बालसेविकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. गणवेशधारी सेविकांचे नागरिकांनी मार्गावर रांगोळ्या काढून तसेच ध्वजावर पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. सेविकांचा घोषगण हा संचलनातील प्रमुख आकर्षण ठरला.

या कार्यक्रमाला समाचार वृत्तपत्राच्या संपादिका स्वातीताई कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांचा परिचय व स्वागत झाल्यानंतर त्यांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रांत सहकार्यवाहिका लीनाताई घारपुरे यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी अधिकाधिक महिलांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन लीनाताई घारपुरे यांनी केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…