कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन यात्रेचे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी पवित्र कलशाचे वंदन करून यात्रेचे स्वागत केले.
संत गुरु रविदास महाराजांनी दिलेला समता, सामाजिक एकात्मता, सद्भाव, बंधुता आणि मानवतेचा संदेश आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. ही कलश वंदन यात्रा कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतून प्रवास करून समरसता, सद्भाव, समता आणि सामाजिक बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणार आहे. संत गुरु रविदास महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक समतेच्या संदेशाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समरस व सशक्त समाजनिर्मितीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका स्वाती जायसवाल, नीलम गुरव, मंडळ अध्यक्ष सुनील गुरव, संजय जयस्वाल, प्रदेश कार्यकारी परिषद सदस्य नितीन चौहान, यात्रा प्रमुख अश्विन अहिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन यात्रेचे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी पवित्र कलशाचे वंदन करून यात्रेचे स्वागत केले.
संत गुरु रविदास महाराजांनी दिलेला समता, सामाजिक एकात्मता, सद्भाव, बंधुता आणि मानवतेचा संदेश आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. ही कलश वंदन यात्रा कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतून प्रवास करून समरसता, सद्भाव, समता आणि सामाजिक बंधुतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणार आहे. संत गुरु रविदास महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक समतेच्या संदेशाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समरस व सशक्त समाजनिर्मितीचा संकल्प यावेळी करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका स्वाती जायसवाल, नीलम गुरव, मंडळ अध्यक्ष सुनील गुरव, संजय जयस्वाल, प्रदेश कार्यकारी परिषद सदस्य नितीन चौहान, यात्रा प्रमुख अश्विन अहिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


