वाळू, मुरूम तस्करीला महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद

चांदापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक मार्गानवार यांचा आरोप

चंद्रपूर , गौरव पराते ( प्रतिनिधी ) : मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरूम आणि मातीची अवैध तस्करी सुरू असून, याला महसूल प्रशासनाची मूक संमती असल्याचा आरोप चांदापूर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सदस्य तथा माजी उपसरपंच अशोक मार्कंडी मार्गानवार यांनी चंद्रपूर येथे पत्रपरिषदेत केला.

शासनाच्या वाळू धोरणानुसार, वाळू घाटातून उत्खनन व वाहतूक करण्यापूर्वी कंत्राटदारांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत हद्द कायम मोजणी करून ताबा देणे बंधनकारक आहे. मात्र, येथील तहसीलदारांनी कोणतीही मोजणी न करताच कंत्राटदारांना वाळू उपसा करण्यासाठी ताबा दिल्याचा आरोप मार्गानवार यांनी केला.

भूमी अभिलेख कार्यालयाच्या नियमानुसार तातडीची मोजणी करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागतो. माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली असता, तहसीलदार यांच्या पत्रानंतर केवळ एकाच वाळूघाटाची मोजणी झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी आणि संबंधितांवर वचक निर्माण करण्यासाठी तहसीलदारासह उपविभागीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अशोक मार्कंडी मार्गानवार यांनी दिली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…