दिव्यांग कल्याण संस्थेच्या उपक्रम संचालकपदी चिंतामण पागे

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ): दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’च्या उपक्रम संचालकपदी चिंतामण पागे यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पागे यांच्यावर संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे तसेच दिव्यांगांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर दिव्यांगांचे राजकीय व सामाजिक पुनर्वसन करण्यासाठीही संस्था कार्यरत राहणार आहे. चिंतामण पागे हे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी असून वीज मंडळात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांच्या प्रश्नांसाठीही योगदान देण्याचा निर्धार केला आहे.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणींवर संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठविण्यात येईल, असे चिंतामण पागे यांनी सांगितले. पागे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी राजेंद्र कुलकर्णी, अनिल अहिरे, हर्षल काटे, अमोल आभाळे, राजेंद्र क्षीरसागर व गणेश कुंभारे यांच्यासह वीज कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. कामगार चळवळीबरोबरच दिव्यांगांच्या कल्याणासाठी नवी सामाजिक जबाबदारी स्वीकारल्याने पागे यांच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…