दोन दिवसांत सोन्याने घेतली मोठी झेप! प्रति तोळा ₹5,710 ची वाढ; खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा

ऑगस्टच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी उसळी; चांदी मात्र स्थिर

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काहीसा दिलासा देणारे सोन्याचे दर आता पुन्हा वेगाने वाढू लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी आजचे ताजे दर जाणून घेणे गरजेचे ठरले आहे.

6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,860 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर प्रति ग्रॅमचा दर 14,986 रुपये आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असून प्रति ग्रॅम 13,740 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,12,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 11,245 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. मेकिंग चार्जेस आणि GST धरून 22 कॅरेट सोन्याचा दागिना प्रति तोळा सुमारे 1,58,505 रुपयांना मिळत आहे.

दरम्यान, आज एका दिवसातच सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 2,870 रुपयांची वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सोनं 5,710 रुपयांनी महागलं असून, जुलैच्या सुरुवातीच्या तुलनेत दरात सुमारे 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र आज कोणताही बदल झालेला नाही. चांदी 2,40,000 रुपये प्रति किलो या दराने विकली जात असून, ती अजूनही तिच्या उच्चांकापेक्षा सुमारे 1.85 लाख रुपयांनी स्वस्त आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने सोन्याच्या दरातील ही वाढ ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे दागिने खरेदीचा विचार करत असाल, तर बाजारातील ताजे दर तपासूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Gold Price Today: दिवाली से पहले सोने के भाव में उछाल, जानें 24, 22 और 18 कैरेट के नए रेट

दिवाली का त्योहार नजदीक है और ऐसे में कई परिवार सोने के गहने खरीदने की तैयारी कर रहे हैं। कोई अपने लिए छोटा-सा आभूषण खरीदना चाहता है, तो कोई त्योहार…

दिवाली से पहले सोना-चांदी हुआ सस्ता, खरीदारों को राहत!

Gold Rate Today : दिवाली का त्योहार नजदीक आते ही बाजारों में सोने-चांदी की खरीदारी बढ़ने लगी है। ऐसे में अगर आप भी इस बार अपने घर के लिए सोने…