सोनं-चांदी पुन्हा महागलं! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी उसळी

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम; खरेदीदारांनी आजचे दर तपासूनच घ्यावा निर्णय

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (३ ऑगस्ट) सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उंच झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी आजचे दर जाणून घेणं महत्त्वाचं ठरत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील प्रस्तावित लष्करी कारवाई सध्या टाळण्याचे संकेत देत मुत्सद्दी मार्गाने प्रश्न सोडवण्यावर भर दिला. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोनं आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातील कॉमेक्सवर सकाळी सोन्याचा भाव ०.२५ टक्क्यांनी वाढून ४११७.३० डॉलर प्रति औंस इतका झाला. तर चांदीने अधिक वेगाने वाढ नोंदवत ०.९० टक्क्यांच्या उसळीसह ५८.३०५ डॉलर प्रति औंस हा स्तर गाठला.

देशांतर्गत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही दोन्ही धातूंमध्ये तेजी कायम राहिली. सोन्याचा दर १८१ रुपयांनी वाढून ₹१,४३,५५७ प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव ८६३ रुपयांनी वाढून ₹२,१८,०६१ प्रति किलोवर पोहोचला. आजच्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ₹१,४३,५५७ प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं ₹१,३१,६७९ प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोनं ₹१,०७,७३८ प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत आहे. चांदीचा दरही वाढत सुमारे ₹२,१८,७१० प्रति किलोवर पोहोचला आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचे बजेट पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दागिने किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील ताजे दर तपासूनच निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

8th Pay Commission : पुराने पेंशनर्स के लिए बड़ा सवाल, PM मोदी से सीधे हस्तक्षेप की मांग

नई दिल्ली : आठवें वेतन आयोग को लेकर केंद्रीय कर्मचारी ही नहीं, बल्कि रिटायर हो चुके कर्मचारी और पेंशनर्स भी अपनी मांगों को लेकर सक्रिय हो गए हैं। आयोग की…

ऐन गणेशोत्सव में सोना हुआ सस्ता, कीमतों में बड़ी गिरावट; जानें 18K, 22K और 24K के आज के भाव

Gold Price Today : गणेशोत्सव के बीच सोना-चांदी खरीदने वालों के लिए राहत भरी खबर सामने आई है। 11 सितंबर को सोने और चांदी की कीमतों में बड़ी गिरावट दर्ज…