सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम देशात बघायला मिळतोय. भारताला या युद्धाची झळ बसत आहे. गॅसचा तुटवडा आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच चालले तर भारतात अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. थेट महागाई वाढताना दिसत आहे. मुंबईत आता CNG आणि PNG महाग झाले. हा मोठा दणका सर्वसामान्यांना म्हणावा लागेल. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) आजपासून CNG आणि PNG च्या दरात वाढ लागू करण्यात आली. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होताना दिसतंय. CNG चा दर प्रति किलो ₹84 वरून ₹86 करण्यात आला. ही एक मोठी वाढ म्हणावी लागेल. दोन रूपयांनी वाढ करण्यात आली. प्रति किलो मागे. PNG (घरगुती पाइप गॅस) चा दर ₹51.50 वरून ₹52 प्रति युनिट झाला. मे महिन्यात CNG दरवाढीची ही दुसरी फेरी आहे. 13 मे रोजीही ₹2 प्रति किलो वाढ झाली होती. एप्रिलमध्येही CNG दरात ₹1 प्रति किलो वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा वाढ करण्यात आली. सततच्या दरवाढीमुळे ऑटो, टॅक्सी आणि बस चालकांवर आर्थिक भार वाढणार. ज्यामुळे भांडे वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांना प्रवासाकरिता अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. मुंबई रिक्षामेन्स युनियनने भाडेवाढीची मागणी केलीये. इंधन खर्च वाढल्याने ऑटो-टॅक्सीच्या मूळ भाड्यात वाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे मत. ज्यामुळे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे. टॅक्सी संघटनांनी किमान ₹2 ते ₹3 भाडेवाढीची मागणी केली आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागामार्फत MMRTA कडे पाठवला जाणार. ही भाडेवाढ झाली तर थेट ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
CNG दरवाढीचा परिणाम मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण MMR परिसरातील प्रवाशांवर होणार. PNG दरवाढीचा फटका 31 लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना बसण्याची शक्यता. जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील अडथळे, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदी खर्च वाढल्याचे MGL चे स्पष्टीकरण.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…