लोकतंत्र मिरर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार; ३०० विद्यार्थ्यांनी घडविल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

७ शाळांचा सहभाग; शाडू मातीच्या गणेशमूर्तींतून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागपूर : लोकतंत्र मिरर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन येथील जवाहर गुरुकुल विद्यालयात इको-फ्रेंडली गणेश मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नागपुरातील सात शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत शाडू मातीपासून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी हेमा देशपांडे व श्री शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक महादेवराव मानकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यांच्यासह जवाहर गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून विविध आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. तयार करण्यात आलेल्या मूर्तींचे परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात नैसर्गिकरीत्या विरघळून मातीत मिसळतात. त्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्पर्धेत निर्भय खंडारे, लखन देवगडे, अवेरा रामटेके, प्रिया शाबू आणि निशांत चौधरी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. लोकतंत्र मिररच्या या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पोहोचविणे हा होता. सात शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिला. पुरस्कार वितरणानंतर उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी लोकतंत्र मिररचे महाव्यवस्थापक मोहन जाधव (नागपूर), महाव्यवस्थापक हितेश कोवे (नागपूर) आणि व्यवस्थापक प्रणय डाबरे(नागपूर) उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…