अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : भारतीय जनता पार्टी, अमरावतीच्या वतीने कॅम्प रोड येथील जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील हजारो माता-भगिनींनी उपस्थित राहून मान्यवरांना रक्षासूत्र बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेत बाळ गमावलेल्या पुलगाव येथील पूजा स्वप्नील बोरगे यांच्या कुटुंबाला यावेळी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच मिसबा अमजद हुसेन आणि हिना तौसूद तस्लिम खान यांनाही रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली. महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने जनसंपर्क कार्यालय परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. रक्षाबंधनाच्या माध्यमातून बहीण-भावाच्या नात्याबरोबरच सामाजिक संवेदनशीलता आणि गरजूंच्या मदतीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी, जयंतजी डेहनकर, चेतन पवार, राजेश पड्डा, महिला मोर्चा अध्यक्ष सुधाताई तिवारी, लताताई देशमुख, भारतीताई गुहे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


