भाजपाची शहर जिल्हा कोअर कमिटी जाहीर : आ. अमरनाथ राजुरकर जिल्हाध्यक्ष

नांदेड,  रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारतीय जनता पक्षाच्या नांदेड शहर जिल्हा संघटनेची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली असून या नवीन कोर कमिटी मध्ये आमदार अमरनाथ राजूरकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुनील राणे यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले.

या कोअर कमिटीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, शितल खांडील, विजय गंभीरे आणि सुषमा थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्यबापू देशमुख, ॲड. दिलीप ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांचा समावेश करण्यात आला आहे. खासदार व आमदारांतून राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण व खासदार अजित गोपछडे यांच्या समावेश करण्यात आला असून महापौर/जिल्हा परिषद अध्यक्ष या गटातून महापौर कविता मुळे, तर जेष्ठ नेते म्हणून माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांना या कमिटीत स्थान देण्यात आले आहे.

त्याचबरोबर नांदेड दक्षिण व उत्तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोअर कमिटी अस्तित्वात आली असून त्याचे प्रमुख ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे व जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख असून उत्तर ग्रामीणच्या कोअर कमिटीत अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. आता जिल्हा कार्यकारिणी कोणते निर्णय घेणार आणि कोअर कमिटी कोणते निर्णय घेणार असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…