‘प्रहार’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा उत्साहात संपन्न!

न्यायाचा ध्यास, सत्याची ताकद आणि संघर्षाची प्रेरणागाथा उलगडणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ,उमेश आबनावे (जिल्हा प्रतिनिधी) : पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, पुणे महानगरपालिकेच्या शासननियुक्त नगरसेविका तथा पिसोळीच्या माजी सरपंच स्नेहलताई गणपत मामा दगडे यांच्या वतीने आयोजित ‘प्रहार – The Untold Story of Ujjwal Nikam’ या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा कॉम्प्लेक्स सिनेमाज, ट्रिबेका हायस्ट्रीट मॉल, NIBM, कोंढवा, पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने आणि शुभाशीर्वादाने आयोजकांसाठी हा क्षण अभिमानाचा व प्रेरणादायी ठरला. न्यायासाठीचा संघर्ष, सत्यनिष्ठा आणि धैर्य यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेतील संघर्ष आणि सत्यासाठी लढण्याची जिद्द प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, नगरसेविका प्रियंका शेंडगे, महिला मोर्चा भाजपा सचिव गणतंत्रा बिंदा, नगरसेविका प्राचीताई आशीष आल्हाट, शासननियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जगदाळे, भाजपा पुणे जिल्हा चिटणीस गणेश भोसले, शासननियुक्त नगरसेवक मच्छिंद्र दगडे, सामाजिक कार्यकर्ते बापू लोणकर, ऋतुजाताई गणपत मामा दगडे, पिसोळीचे सरपंच दीपक धावडे, तानाजी काळभोर, अमोल काळभोर, प्रज्वल दगडे, वंदना परमार, नरेंद्र ठक्कर, भूषण डांगी आणि सुप्रज्ञाताई जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य प्रीमियर सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे, चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या चित्रपटप्रेमी प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…