पाण्याचा काटकसरीने वापर करा ; पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : आ. बोंढारकर

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आगामी काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केले आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे तसेच नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे या भागात पाण्याची उपलब्धता राहण्याची शक्यता असली, तरी नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा कमी होत असल्याने पाण्याच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एल निनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर नांदेड शहरासह ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…