डिझेल नसल्याने देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं

हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल नसल्याच कारण देत गरोदर मातेला रुग्ण वाहिका नाकारली होती. प्रायव्हेट वाहिकेतुन हिंगीलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले, मात्र उशीरा पोचल्याने आईच्या पोटात बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे एकच खळबळ माजली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या पेशंटला रुग्णालयात हलवायचं होतं. आम्ही 850 चं डिझेल टाकून स्वत: गाडी केली आणि तिला इथे घेऊन आलो. मग हिंगोलीतल्या रुग्णालयात ॲडमिट केलं. पण तोपर्यंत उशीर झाला. कारण इथे आल्यावर आम्हाला डॉक्टर म्हणाले, ताई तुम्ही जर लौकर आला असतात तर तुमचं बाळ वाचू शकलं असतं. पण तुम्हाला (यायला ) वेळ लागल्यामुळे बाळ वाचलं नाही, असं त्यांनी सांगितल्याचं, महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं.
आम्ही येणारचहोतो पण अँब्युलन्सला डिझेल नव्हतं, त्यामुळे अँब्युलन्स आम्हाला इथे घेऊन आली नसल्याचं नातेवाईकांनी त्यांना सांगितलं.
दरम्यान या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे, असं म्हणावं लागेल. कारण कुठेही इंधन तुटवडा नाही अशा घोषणा सरकारकडून केल्या जातात, अशा वेळेस हिंगोलीमध्ये ही घटना घडली आहे. फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन मिळालं नाही, म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलं , अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…