केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला

केरळमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डाव्या पक्षांच्या एलडीएफचा यावेळी पराभव झाला आहे. केरळमध्ये भाजपनं (BJP) पहिला विजय मिळवला आहे. तर, आणखी दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या चथन्नूर मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. 2021 मध्ये चथन्नूर विधानसभा मतदारसंघात डाव्या पक्षानं 17 हजार मतांनी विजय मिळवला होता. केजागारळमध्ये काँग्रेसच्या यूडीएफला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, डाव्या पक्षांच्या एलडीएफला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपनं एका जागेवर विजय मिळवलाय तर दोन ठिकाणी ते आघाडीवर आहेत.
भाजपचे उमेदवार बीबी गोपकुमार यांनी डाव्या पक्षांचे उमेदवार अॅड. आर. राजेंद्रन यांचा 4398 मतांनी पराभव केला आहे. याशिवाय भाजपचे उमेदवार नेमोम आणि कझकोट्टम विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
भाजपच्या बीबी गोपकुमार यांना चथनूर विधानसभा मतदारसंघात 51923 मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या भाकपच्या आर राजेंद्रन यांना 47525 मतं मिळाली आहेत.तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सूरज रवी आहेत, त्यांना 35276 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात आम आदमी पार्टीला 613 मतं मिळाली आहेत.
सायंकाळी पाचपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आणखी दोन जागांवर आघाडी मिळवत आहे. गोपकुमार यांनी विजय मिळवला आहे. तर नेमम विधानसभा मतदारसंघात राजीव चंद्रशेखर आघाडीवर आहेत. त्यांना जवळपास तीन हजार मतांची आघाडी आहे. केरळमध्ये 9 एप्रिलला मतदान झालं होतं. आज केरळ विधानसभेचा निकाल जाहीर झाला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये केरळमध्ये एलडीएफचा विजय झाला होता. मात्र, यावेळी एलडीएफचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रणितयूडीएफ 100 जागांच्या जवळ पोहोचली आहे. तर एलडीएफ 30 जागांपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून केरळमध्ये डावे पक्ष सत्तेत होते. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदललं जातं. मात्र, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्त्वात एलडीएफनं विजय मिळवला होता. यावेळी मात्र काँग्रेस प्रणित यूडीएफनं सत्ता मिळवली आहे. केरळमधील संभाव्य निवडणूक निकालांचा अंदाज घेत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटस मधून मुख्यमंत्री पदाचा उल्लेख काढला होता. आता केरळमध्ये सत्ता बदल झाला असून काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्तेत येईल. भाजपनं देखील केरळमध्ये खातं उघडलं आहे.

Related Posts

टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…