युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी पुतिन सरकारने २०२६ या वर्षात आतापर्यंत २२ टन सोन्याची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. वाढता संरक्षण खर्च आणि रुबलवरील दबाव यामुळे रशियाला हे पाऊल उचलावे लागल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, रशियाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


