भारत आणि रशिया यांच्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक लष्करी करार झाला आहे. ‘रेलोस’ नावाच्या या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर सैनिक, युद्धनौका आणि विमाने तैनात करू शकणार आहेत. या करारामुळे भारताला आर्क्टिक क्षेत्रात प्रवेश मिळणार असून, रशियाला हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवता येणार आहे. जानेवारी २०२६ पासून हा करार लागू झाला असून, त्यामुळे भारताचे सामरिक स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे पाकिस्तानची चिंता वाढल्याची चर्चा आहे.


